Categorized | Dawat

ईद मिलन कार्यक्रम संम्पन्न

Posted on 15 June 2019 by Webmaster JIH Maharashtra

 

जाते इस्लमी हिंद लातूरचा एक स्तुत्य उपक्रम

१५ जून रविवारी भालचंद्र ब्लड बँक येथे सायंकाळी जमाते इस्लमी हिंद लातूर तर्फे दर वर्षा प्रमाणे यावर्षीही नुकत्यात साजऱ्या झालेल्या ईद-उल-फित्र च्या निमित्ताने ईद मिलन चा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद बीड हुन मुद्दामहून आलेले अब्दुल हमीद यांनी भूषवले.
कार्यक्रमाची सुरुवात ओसामा पटेल यांनी केलेल्या कुराण पठाणाने झाली त्याचा अनुवाद मराठीमध्ये निसार सिद्दीकी यांनी सादर केला.
त्यानंतर कार्यक्रमाचे याची प्रस्तावना शहराध्यक्ष अब्रार मोहसिन यांनी केली. त्यांनी आपल्या संबोधनात जमात-ए-इस्लामीच्या कार्याचा आढावा घेतला. त्यात लातूर येथे विशेषत्वाने गरजूंना जमात च्या युनिटी पतसंस्थेच्या मार्फत 94 लाखापेक्षा अधिक बिनव्याजी कर्ज देण्यात आल्याचे सांगितले.
या शिवाय त्यांनी लातूरच्या गरीब वस्त्यांमध्ये 2 ओपीडी क्लीनिक सुरू केल्याची ही माहिती दिली जेथे अवघ्या पन्नास रुपयांमध्ये तपासणी व तीन दिवसांचा औषध उपचार केला जातो.
या प्रसंगी जमात च्या ईतर सामाजिक कामाचा ही त्यांनी धावता आढावा घेतला
त्यांच्यानंतर ख्रिश्चन धर्मगुरू फादर कॅमेरू यांनी आपले विचार मांडले, त्यानंतर मुफ्ती युनूस, काम शाहू कॉलेजचे प्राचार्य गव्हाणे, ही यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले.
यानंतर लातूरचे प्रसिद्ध उर्दू शायर अजय पांडे ‘बेवक्त’ आणि प्रसिद्ध समाजसेवक हातीम शेख यांचाही त्यांनी केलेल्या सामाजिक कामा साठी सन्मान करण्यात आला. सन्मानाला दोघांनीही यथोचित उत्तर दिले.
अध्यक्ष भाषणामध्ये शेख हमीद यांनी रोजा, रमजान आणि ईद चे महत्व यावर प्रकाश टाकला. त्यांनी त्यातून होणाऱ्या चारित्र्य निर्मितीसंबंधी सविस्तर असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉक्टर फारूक तांबोळी यांनी केले तर आभार जमातचे सचिव अशफाक अहमद यांनी मानले.

कार्यक्रमानंतर मोठ्या संख्येने जमा झालेल्या हिंदू मुस्लिम आणि दलित बांधवांना साठी शीरखुर्म्यापाना चे आयोजन करण्यात आले होते ज्याचा सर्वांनी आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली.
मीडिया सेल जमाते इस्लमी हिंद लातूर

 

WhatsApp Image 2019-06-19 at 2.07.18 PM

  • Post a comment

    Threaded commenting powered by interconnect/it code.

ऑनलाईन प्रेषित परिचय संमेलन २०२०

Get the latest updates via Email

Watch Our Latest Video

VISIT OUR OTHER WEBSITES