Categorized | Dawat

~*ईष्वरीय अनुभूतीच मानवी कल्याण दडले आहे’डॉ.इक्रामखान काटेवाला

Posted on 16 June 2019 by Webmaster JIH Maharashtra

 

➖➖➖➖➖➖➖➖
जमाते इस्लामी हिंद उदगीरच्या वतीने रमजान ईदनिमित्त बुधवार 12 मे रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमातअहमदनगरचे डॉ.इक्रामखान काटेवाला यांनी फक्त ईश्वराला मानून चालणार नाही तर त्याची अनुभूती महत्तवाची असते.ज्याला ही अनुभूती प्राप्त होते तो सदाचारी जीवन जगतो. हीअनुभूती रोजाच्या माध्यमाने रमजान महिन्यात प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो.
सामाजिक सद्भावना प्रेम,बंधुभाव,आचार विचारांची देवाणघेवाण व आस्था व धारणांचा परिचय असे उद्देश
समोर ठेवून जमाते इस्लामी उदगीरने ईद मिलनचीअखंडीत परंपरा चालू ठेवली आहे.रघुकूल मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाची सुरूवात हाफिज राजापटेल अ. अजीज यांनीकुरआन पठणाने केली. प्रास्ताविकात जमाते इस्लामीचे शहराध्यक्ष डॉ.शेख असगर जमातच्या कार्याचा परिचय करून दिला.प्रमूख
पाहूणे म्हणून समाजवादी कार्यकर्ते रंगा राचूरे,किसान शिक्षण
प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील शिरोळकर,प्रजापिता
ईश्वरीय विद्यालयाच्या प्रमूख महानंदा दीदी,व बौद्ध
धर्मगुरू भदंत नागसेन बोधी. हे उपस्थित होते. असे कार्यक्रम आज समाजाची गरज असल्याचे प्रतिपादन पाहूण्यानी यावेळी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.इक्रामखान काटेवाला यांनीईदबद्दल सांगितले की ईदपूर्वी प्रत्येक सधन कुटुंबातून प्रत्येक व्यक्तिच्या नावाने अडीच किलो गहू किंवा त्याची
किंमत दान करणे अनिवार्य आहे. जेणेकरून ईद सर्वांनीआनंदाने साजरी करावी. त्यांनी पैगंबरांच्या या वचनाचा उल्लेख केला की, तो व्यक्ती मुस्लिम नाही ज्याचा शेजारी
उपाशीपोटी झोपत असेल.
कार्यक्रमात जमाते इस्लामीचे जिल्हाध्यक्ष हाशमी मिसबाहोद्दिन,जेष्ठ नागरिक संघाचे सचीव प्रकाश देशपांडे,माजी प्राचार्य बी.जी वेळापूरकर,फारूकी रफियोद्दिनअध्यक्ष मिल्ली फोरम व मराठा सेवा संघाचे अतनुरे सर इ. मंचावरउपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार देवणीकर मु.हक्कानी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट शिरखुर्मा ने झाली*~

 

WhatsApp Image 2019-06-16 at 1.33.28 PM (1) WhatsApp Image 2019-06-16 at 1.33.28 PM

  • Post a comment

    Threaded commenting powered by interconnect/it code.

ऑनलाईन प्रेषित परिचय संमेलन २०२०

Get the latest updates via Email

Watch Our Latest Video

VISIT OUR OTHER WEBSITES