मुंबई : उद्या 19 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष, मौलाना इलियास खान फलाही यांनी राज्यातील मतदारांना आवाहन केले आहे .1 जून रोजी संपूर्ण भारतात सात टप्प्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल आणि 4 जून रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा लोकशाहीचा पाया आहे असे म्हटले जाते, जे आपल्या संविधानात मूलभूत अधिकार म्हणून ठेवलेले आहेत. निवडणूक हे अधिकारांचे रक्षण करण्याचे उत्तम माध्यम आहे ज्याद्वारे आपण असे सरकार निवडू शकतो जे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य देईल , जेणेकरून देशाच्या सध्याच्या प्रतिकूल वातावरणाला न्याय आणि समानतेच्या वातावरणात बदलणारे सरकार निवडून आणण्याचा आपण एक भाग होऊ शकतो.
तुमचे मत हाच तुमचा आवाज असून, त्यातूनच देशाला योग्य दिशा मिळू शकते, असे मौलाना इलियास खान यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. तुमचे मत हे तुमच्यासाठी सरकारच्या सर्व धोरणांमध्ये तुमच्या समाजाच्या प्रति हित लक्षात घेते.
मौलाना इलियास खान यांनी भर दिला की, “मतदार यादीत तुमचे नाव नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करा, नसल्यास ऑनलाइन नोंदणी करा. सर्वांना मतदानाचे महत्त्व सांगा आणि मतदानासाठी जागृत करा, मतदार यादीत तुमचे नाव नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.” 12 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटोसह बँकेचे पासबुक इत्यादी सोबत ठेवता येईल. शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्रावर वेळेवर पोहोचा. स्वतःचे मतदान करा आणि इतरांना मतदानासाठी आमंत्रित करा. तुमच्या शेजारचे लोक बूथवर पोहोचतील याची दक्षता घ्या .
जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राने आपल्या निवेदनात न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेसाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे आणि मतांचे विभाजन होऊ देऊ नका, हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. तुमचे मत केवळ या निवडणुकीतच नाही, तर ते पुढील निवडणुकीच्या नियोजनासाठी खूप उपयुक्त आहे, त्यामुळे प्रत्येक महिलेला मतदानाचे महत्त्व सांगा आणि त्यांना मतदान करण्याची सुविधा निर्माण करा.
मौलाना इलियास खान यांनी समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींना आवाहन केले आहे की, समाजसेवक आणि विचारवंतांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे आणि प्रत्येक मताचे 100 टक्के मतदान महत्त्वाचे आहे एक मजबूत, अधिक शांततापूर्ण समाज निर्माण करूया आणि आपल्या लोकशाही अधिकाराचा वापर करूया आणि आपल्या देशाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी योगदान देऊ या.
Issued by:
Arshad Shaikh
Secretary, Media Dept. Jamaat-e-Islami Hind, Maharashtra
Address: Darul Faiz, 7th floor, Iqbal Kamali Junction, 4 Sankli Street
Madanpura, Byculla (West),
Mumbai – 400008
Mobile: 9717424918
Email: mediacell@jihmaharashtra.org