14 जुलै 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली, विशाळगड आणि गजापूरच्या ‘मुस्लिमवाडी’ वस्तीतील मुस्लिमांच्या मालमत्तेचे आणि प्रार्थनास्थळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
त्यानुसार शुक्रवार 19 जुलै 2024 रोजी जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या शिष्टमंडळाने त्या भागातील अधिकाऱ्याशी बोलून गजापूर येथील दंगलग्रस्त भागातील मशिदीचे पदाधिकारी व पीडितांची भेट घेऊन सांत्वन केले. आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
नुकसानग्रस्त घरे, दुकाने, हॉटेल, चारचाकी वाहने, मोटारसायकल आदींची नुकसानीचे तपासणी करण्यात आली.
सध्या संचारबंदी सुरू आहे, त्यामुळे सर्वेक्षण होऊ शकले नाही.
काही दिवसांनी बाधितांचे संपूर्ण सर्वेक्षण करून पुनर्वसनाचे काम सुरू केले जाईल.
सध्या परिस्थिती आता स्थिर आहे.
मशिदीची स्वच्छता केल्यानंतर शुक्रवारपासून नियमितपणे नमाज अदा करण्यात येत आहे.
जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्राने मदत कार्य आणि दंगलग्रस्तांना मूलभूत वस्तूंची तत्काळ तरतूद करण्याचे काम सुरू केले आहे.
इन्शाअल्लाह लवकरच पुनर्वसनाचे काम सुरू होईल.
जमाअतच्या या शिष्टमंडळात मोहम्मद मजहर फारुख, नदीम सिद्दीकी, इस्माईल शेख, अशफाक पठाण आणि निहाल शेख यांचा समावेश होता.