आज ऑनलाईन ईद मिलन

Posted on 21 May 2021 by Zonal Admin

jih EID

आज ऑनलाईन ईद मिलन

औरंगाबाद –
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आयोजित होतात तसे मोठ मोठे ईद मिलन‌ समारंभ आता शक्य नसल्याने आता जमाअत ए इस्लामी हिंदच्या महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभागातर्फे ऑनलाईन ईद मिलन आयोजित करण्यात आले आहे. यात शिरखुर्म्याची मेजवानी तर नसेल पण वैचारिक मेजवानी नक्कीच असणार आहे. याची रेकाॅर्डींग आधीच झालेली आहे, आता फक्त ते “Jmaat-e-Islami Hind Maharshtra” या फेसबुक पेजवर आणि “DrishtiTheVision” या युट्यब चॅनेलवर प्रीमियर लाईव्ह करण्यात येणार आहे.
दि. २० मे २०२१ रोजी रेकाॅर्डींग झालेल्या या ऑनलाइन ईद मिलन कार्यक्रमात प्रा. श्रावण देवरे साहेब (नाशिक), मा. नंदाताई पाटील (मिरज, सांगली), मा. मेघराजसिंघजी खालसा साहेब (पेन्सिलवणीया, अमेरिका) यांनी फार महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. , जमाअत ए इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभागाचे सचिव मा. मुहम्मद समी साहेब, जळगाव यांनी सुरुवातीला कुरआन पठण व प्रास्ताविक भाषण केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जमाअत ए इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष मा. रिजवान उर रहमान खान साहेब, नागपूर यांनी भूषविले. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन मा. नौशाद उस्मान, औरंगाबाद (ज्येष्ठ पत्रकार) यांनी केले. हाच कार्य्रक्रम रविवार दि. २३ मे २०२१ रोजी ८ वाजता युट्युबवर आणि फेसबुक पेजवर रात्री ८ वाजता प्रीमिअर लाईव्ह केला जाणार आहे.

ओबीसी समाज आणि मुस्लिम समाजाविषयी प्रा. श्रावण देवरे सरांनी यावेळी फारच क्रान्तिकारक मार्गदर्शन केले आहे. या. रीज़वान‌ उर रहमान‌ खान यांनीही रमज़ान‌ व‌ ईदच्या पार्श्वभूमीविषयी खुप मोलाची माहिती सांगितलेली आहे.‌ इतर वक्त्यांचीही भाषणे ऐकण्यासारखी आहेत. ते ऐकण्यासाठी हा कार्यक्रम नक्की बघावा. सर्वांनीं याचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने शेअर करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहितीसाठी 1800 572 3000 या टोलफ्री नंबरवर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. आयोजकांतर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात सदर माहिती देण्यात आली आहे.

  • Post a comment

    Threaded commenting powered by interconnect/it code.

ऑनलाईन प्रेषित परिचय संमेलन २०२०

Get the latest updates via Email

Watch Our Latest Video

VISIT OUR OTHER WEBSITES